About Us

नमस्कार !
प्रिय मित्रांनो,
मी सिद्धार्थ मयेकर. रत्नागिरी जिल्ह्यातील माझा जन्म. तसं पाहता आपल्या रत्नागिरी मध्ये अनेक नामवंत व्यक्तिमत्वांनी जन्म घेतला. प्रत्येकाची कारकीर्द वेगवेगळ्या स्वरुपाची, पण महत्त्वाचे हे कि या व्यक्तिमत्वांनी इथल्या प्रत्येकाच्या मनावर काही छाप सोडली आणि त्याचेच मार्गदर्शन मला माझ्या शिक्षकांकडून लाभले. माझे अगदी खेळघर ते इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण रत्नागिरीतील फाटक हायस्कूल मध्ये पूर्ण झाले. लहानपणापासून मी तसा अबोल होतो. पण याच शाळेमध्ये माझ्यातल्या मी मला सापडला. B.A Psychology (मानसशास्त्र) चे शिक्षण मुंबई मुक्त विद्यापीठातून पूर्ण केले, आता गेली सहा वर्षे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम करीत आहे.
    शालेय जीवनात मी शांत होतो, शांत स्वभाव असल्याने कायम पहिल्या बाकावर बसायचो. सतत शिक्षकांच्या नजरे समोर असल्यामुळे वर्ग प्रमुख झालो आणि बघता बघता नेतृत्व गुण आत्मसात झाले. शिक्षकांनी जबरदस्तीने प्रत्येक उपक्रमात सहभाग घायला लावला. पास-नापास ची चिंता सोडून मी माझे सर्व प्रयत्न सुरु केले. हळूहळू वाचन वाढलं, बोलायला लागलो आणि भाषण आणि लेखनाची सुरुवात झाली. या प्रकारे जे मी अनुभव घेत होतो त्या बद्दल लिहित गेलो. माझ्या प्रत्येक ब्लॉगच्या शेवटी मध्ये मी एक वाक्य लिहितो I write... ✍🏻 what I feel... 💖💖 म्हणजेच जे मला फिल होते ते मी लिहितो. फक्त आवड म्हणून नाही तर माझे महत्त्वाचे विचार मला कधीही वाचता यावे या साठी. ना कोणत्या धर्मासाठी, ना कोणत्या पक्षासाठी मी लिहितो फक्त स्वतः साठी. 
    माझ्या लेखणीतून इतरांना माहिती देणे एवढेच माझे काम आहे असे मी मानतो. इतरांना प्रेरित करण्या एवढा मी मोठा नाही तरीही एक प्रयत्न.
    आशा आहे मी या ब्लॉग मधील काहीना काही माहिती आपल्या उपयोगी नक्की येईल. कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा काही सुचवायचे असेल तर आपण मला sidharthmayekar1@gmail.com या इमेल वर संपर्क करावा.


धन्यवाद !

आपला

सिद्धार्थ मयेकर

I write... ✍🏻 what I feel... 💖💖

Post a Comment