नेतृत्व – सामर्थ्य कि देण? | Leadership - Strength or Giving?





प्रस्तावना : 

    विषयास सुरुवात करण्यापूर्वी सांगण्यास आवडेल कि कोणत्याही विषयाबद्दल संवाद करण्यासाठी आणि आपले विचार मांडण्यासाठी मातृभाषा हे खूप प्रभावी मध्यम आहे, म्हणून मी माझे विचार व्यक्त करण्यासाठी आपल्या मराठी भाषेचा वापर करत आहे. आज आपली मराठी भाषा हि मिश्र स्वरुपाची आहे जिचा वापर आपण दैनंदिन जीवनात करतो. या संवादा मध्ये देखील आपणास मिश्र भाषेचा वापर दिसून येईल ज्यामुळे मला माझे विचार अधिक प्रभावीपणे मांडता येतील सर्वाना समजण्यास देखील सोयीचे होईल.


नेतृत्व :

    लहानपणा पासून आपण काही साहसी आणि प्रेरणादायी गोष्ठी ऐकत आलो आहोत. ज्या गोष्ठीं मध्ये असलेला प्रत्येक नायका  मध्ये एक उत्तम नेतृत्व सामर्थ्य दिसून येते. प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करण्याऱ्या व्यक्ती ची गरज असते. जसे देशासाठीराष्ट्रपती, राज्यासाठीमुख्यमंत्री, संघामध्येसंघनायक (कॅप्टन) एवढेच नाही तर एक कुटुंब प्रमुख देखील उत्तम नेतृत्व सामर्थ्य असलेली व्यक्ती म्हणून पाहता येईलनेतृत्व कला हि कोणाकडून भेट स्वरुपात किंवा वंश परंपरेने मिळत नसते ती व्यक्तीच्या जन्माला आल्यापासून त्याच्या स्वभावात असावी लागते. त्यामुळे उत्तम लीडर कोण आहे हे सांगण तितक सोप नाही आहे. परंतु मला अस वाटत हि कला प्रत्येका मध्ये असते, गरज आहे ती फक्त ओळखण्याची. या वरून हे समजते कि नेतृत्व हे एक सामर्थ्य आहे देण नाही.

    या सामर्थ्याची ओळख करून देणारी फक्त एक व्यक्ती असे ती म्हणजे आपले शिक्षक . मला माझ्यातील नेतृत्व कला माझ्या शिक्षकांनी दाखवून दिली. मी माझ्या समोर येणाऱ्या प्रत्येक अडचणींना पाठ दाखवून पळत असायचो. प्रत्येक वेळी अपयश मिळायचं, या वेळी मला माझ्या शिक्षकांनी माझ्यातील या कला दाखवण्यास सुरुवात केली आणि हळूहळू माझ्यातील हे सामर्थ्य किती महत्वाचे आणि अभेद आहे याची जाणीव होत गेली आणि पाहता पाहता मी शाळा ते कोलेज मध्ये उत्तम नेतृत्वदायी विध्यार्थी म्हणून ओळख प्राप्त झाली. माझे मित्रांनी मला लीडर (Leader) हे नाव दिले, त्यामुळे मला सतत माझ्या जबाबदारीची जाणीव होत गेली आणि माझ्या प्रवासाची सुरुवात झाली आणि आज मी एक उत्तम उद्योजक आणि एक उत्तम  नेतृत्व्क आहे असे मला वाटते.

आपल्यातील कला ओळखा :

    आता प्रश्न हा येतो कि हि कला माझ्यात आहे कि नाही हे कसं ओळखायचं ? तर याची जाणीव तुम्हाला तेव्हाच होईल ज्या दिवशी तुम्हाला खूप मोठे अपयश किंवा अपमानाचा सामना करावा लागेल. या सर्वाची जाणीव झाली तरच तुमच्यातील या कला बाहेर येतील. बहुदा आपण कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नसतो, कारण आपल्याला एकच भीती असते ती म्हणजे अपयशाची, जर मी अपयशी झालो तर ? अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनात आधीपासून घर करून असतात पण माझ मत असं आहे कि ज्या दिवशी तुम्ही नेतृत्व करण्याची जबाबदारी घेता त्याच दिवशी तुम्ही यशस्वी झालेले असता. यशअपयश कि एक जाणीव असते त्यात कोणताही अपमान नाही. मुळात नेतृत्वकरण्यासाठी तुम्ही तयार आहात हाच तुमचा पहिला विजय आहे.


स्वत:ला कमी समजू नका :

    आपण प्रत्येक वेळी मला हे येत नाही  किंवा मला हे जमत नाही  असे बोलून मोकळे होतो. या मुळे तुम्ही तुमची प्रगती स्वतःच थांबवत असता. मी तर अस बोलतो कि मला योग्य मार्गदर्शन मिळाले तर मी हे नक्की करेन हाच स्वभाव बनवा. हा मी दिलेला एक गुरु मंत्र आहे असे समजा कारण याच एका वाक्याच्या जोरावर मी माझा एवढा प्रवास पूर्ण केला आहे आणि भविष्यात पण असाच पूर्ण करेन.

    आपल्याला  नाही  हा शब्द ऐकायला आवडत नाही, त्याच प्रमाणे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी मला येत नाही  असे वाक्य वापरत असाल तर तुम्ही तुमच्या अधिकारी व्यक्तीच्या नजरेत कमी होत असता कारण त्यांना देखील नाही हा शब्द आवडत नाही. त्यामुळे येणारी प्रत्येक संधी हि आपली आहे असे समजून पुढे या. तुम्हाला लीडर बनायला कोणी सांगणार नाही पण तुम्ही स्वतः इच्छा दाखवून हि लीडरशिप घ्यावी लागेल, आणि एक दिवस तुमच्या कामच्या ठिकाणी तुम्ही लीडर म्हणून ओळखले जाल आणि त्या दिवसापासून तुम्ही तुमच्या ऑफिसचे लीडर असाल.

लीडर कसा असावा?

    लीडर हा स्वार्थी नसावा. येणारे प्रत्येक अपयश हे माझ्या मुळे आहे याची जबाबदारी घेणारा असावा. अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथी फोडणारा नसावा. अपयशा मध्ये देखील आपली टीम कशी मजबूत राहील याकडे लक्ष देणारा असावा. स्पर्धे मध्ये मागे राहून नव्हे तर सर्वात पुढे राहून नेतृव्त करणारा असावा. यशाची हवा डोक्यात शिरू देणारा असावा. टीम मधील प्रत्येकाचा विचार करणारा असावा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दुसऱ्याच्या बोलण्याला भुलणारा नसावा आणि आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णय हा योग्य आहे आणि मी त्याची जबाबदारी घेतो असा लीडर असावा.

Leader is not One Who Creates Leaders
Leader is One Who Can Create
The Leaders of Leading Leaders

बॉस कि लीडर?

    तुम्ही एक उद्योजक आहात तर तुम्हला बॉस आणि लीडर या मधील फरक जाणून घेण खूप महत्वाचे आहे. कारण बॉस हा नेहमी आदेश देवून काम करून घेत असतो या वेळी तुमचा स्टाफ  हा फक्त घड्याळी तासा प्रमाणे काम करेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फक्त पगारासाठी काम करेल हि बाब फक्त माझी नसून जगातील मानसशास्त्रज्ञ देखील याचा दावा करतात.

    लीडर हा आदेश देवून नाही तर त्याच्या टीमच्या सोबत बसून काम करीत असतो. ज्या वेळी तुम्ही तुमचे मत तुमच्या स्टाफ ला पटवून द्याला, तुमचे विचार त्यांच्या स्वप्नांना कसा आकार देईल याची जाणीव करून द्यला त्यादिवशी तुमचा स्टाफ घड्याळी कामगार नसून सर्व भान हरपून काम करेल. तुमचा प्रत्येक फायदा आणि तोटा हा त्यांचा आहे असं काम करतील आणि त्याच वेळी तुमचा व्यवसाय एक उंच भरारी घेईल.

    आपण सगळे अंबानी, टाटा यांच्या प्रवासाची आणि त्यांच्या व्यवसायाचे आणि उत्पन्नाचे कौतुक करत असतो, पण तुम्ही काही हा विचार केला का कि त्यांचा हा डोलारा तर त्यांचा स्टाफ सांभाळतो आहे. आज त्यांच्या कित्येक ब्रांच जगाच्या कानाकोपऱ्यात  आहेत. या सर्व कशा सुरु आहेत? तर ते बॉस म्हणून नाही तर लीडर म्हणून काम करतात. एक उत्तम लीडरच एक उत्तम उद्योजक बनतो. त्यामुळे माझा व्यवसाय किंवा मी मालक आहे या मागे जाता, हा व्यवसाय आपला आहे आणि त्यामध्ये तुमच्या स्टाफ चे महत्त्व त्यांना पटवून द्या.

    बॉस जर ऑफिसला  येणार नसेल तर स्टाफ आनंदी असतो कारण ते बॉसला फक्त डोक्याचा ताप म्हणून पाहतात, पण जर लीडर ऑफिसला येणार नसेल तर पूर्ण स्टाफ नाराज होतो कारण त्याच्या टीमला त्यांच्या लीडर सोबत काम करायला आनंद मिळतो. त्यामुळे मालक असण्याचा मोठे पणा दाखवण्या पेक्षा लीडर बनून त्यांना समजून घ्या.

    आता तुम्ही म्हणाल लीडर बनून स्टाफ डोक्यावर बसला तर ! तर नाही असं कधी झाले नाही किंवा कधी होणारही नाही, कारण लीडर म्हणजे मजा मस्ती नाही तर एक उत्तम मेंटोर म्हणजे पालक असतो. तो परीस्थितीचे गांभीर्य आणि प्रकार समजून निर्णय घेत असतो.

मला माझा लीडर कसा मिळेल?

    तुमच्या पैकी बरेच जन उद्योजक असतीलआणि तुम्हाला तुमचा लीडर हवा असेल तर तुम्हला या संधी उपलब्ध कराव्या लागतील. स्टाफ मध्ये स्पर्धा लावता त्यांना एकजुटीने काम करायला संधी द्या. या मुळे ते त्यांच्यातील लीडर स्वतः शोधतील किंवा तुम्हला त्याची ओळख होईल. त्यांची स्वप्न जाणून घ्या आणि मग त्यांना त्याच महत्व पटवून द्या मग ते पगारासाठी नाही तर स्वताच्या स्वप्नांनसाठी काम करतील आणि ते  तुमचा बिझनेस वेगळ्या उंचीवर घेवून जातील.

    शा आहे कि आजचे माझे विचार तुम्हाला नक्की आवडले असतील, जर आवडले असतील तर कमेंट करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. जर असे अजून काही जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विषय जरूर  मांडा, माझा पुढचा ब्लॉग त्याच विषया संबंधीत असेल.


धन्यवाद !!

by: Sidharth Mayekar -

I write... ✍🏻 what I feel... 💖💖

Copyright© 2020 - 2022

Sidharth

I am experienced in Digital Marketing, Web Developing, Banner Designs, Computer Repairing, Teaching also Motivational Speech.

2 Comments

  1. Really nice thoughts expressed in blog and in website. I think there are lot of things to learn from a young man like you. As a co-villager I am proud of you.

    ReplyDelete
Previous Post Next Post