मुलाखती (Interview) बद्दल बोलू काही...

 


    व्यावहारिक जीवनात काय महत्व आहे हे सांगण्याची गरज नाही. व्यक्तित्व मूल्यमापनासाठीही मुलाखतीचा कसा उपयोग होऊ शकेल यावर मानसशास्रज्ञ विचारकरू लागले व आज ते व्यक्तित्व मूल्यमापनाचे महत्वाचे साधन म्हणून उपयोग करून घ्यावा असा पुरस्कार करीत आहेत.

    मुलाखत हे व्यक्तीला समजून घेण्याचे एक प्रभावी साधन आहे वर्तमानपत्रे व इतर नियतकालिकतून प्रसिद्ध झालेल्या मुलाखती आपण वाचतो. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा परिचय घडविणे हा या मुलाखती मागील महत्वाचा हेतू असतो. मुलाखतीमधून मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास अधिक जवळकीने होत असतो. माणसाला माणूस म्हणून समजून घेणे हे माणसाचे आदिम कुतुहूल असल्यामुळे मुलाखतीचा प्रकार फारच मान्यता पावलेला आहे. नियतकालिका प्रमाणेच रेडिओ, टिव्ही या प्रसार माध्यमासाठीही मुलाखती घेतल्या जातात.


कोणत्याही मुलाखतीला तीन घटक अंगे असतात.
(१) मुलाखत देणारी व्यक्ती
(२) मुलाखत घेणारी व्यक्ती
(३) मुलाखत वाचणारी - ऐकणारी व्यक्ती, पाहणारी व्यक्ती.


प्रसारमाध्यमासाठी ‘मुलाखतीचे लेखन' करताना त्या त्या माध्यमाचे विशेष लक्षात घेऊन काही पथ्ये तर वदतोव्याघात ठरावा. कारण मुलाखत ही अपरिहायपणे मौखिक असते.


अर्थ व उद्दिष्टे (The interview is a Conversation with Purpose):
    मुलाखत म्हणजे विद्यार्थी व शिक्षक यामधील परस्परसंवाद किंवा हृदयसंवाद, विद्यार्थाच्या अडचणी वासमस्या समजून घेणे, त्याच्या गुणदोषांचे स्वरुप लक्षात घेणे, विद्यार्थ्यांना आत्मनिवेदनाची संधी देणे इतर साधनांच्याद्वारे विद्यार्थी संबंधी न मिळालेली माहिती मिळवणे, मिळालेल्या माहितीचे स्पष्टीकरण करून घेणे व परस्पर व्यक्तिगत संबंध प्रस्तापित करून विद्यार्थ्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणे ही मुलाखतीची उद्दिष्टे.


शैक्षणिक दृष्टीने मुलाखतीचे खालील प्रकार महत्वाचे आहेत.

१) संशोधनात्मक मुलाखती (Research Interview):
विद्यार्थ्याच्या आवड निवड, पात्रता व अन्य वैशिष्ट्यांचा शोध घेण्यासाठी.

२) निदानात्मक मुलाखती (Diagnostic Interview):
विद्यार्थ्याच्या समस्या अगर अडचणीचा शोध घेण्यासाठी किंवा त्याच्या अपयशाचे निदान करण्यासाठी.

३) आचारात्मक मुलाखती (Treatment Interview):
विद्यार्थ्यांच्या मनातील, चिंता, भीती, दडपण, गैरसमज इ. दूर करून त्यांच्या वागणूकीत सुधारणा घडवून आणण्यासाठी व त्यांची समायोजन क्षमता वाढविण्यासाठी.

४) माहितीवर मुलाखती (Informative Interview):
निरनिराळे विषय, परिक्षा, अभ्यासक्रम, नोकऱ्या, शिष्यवृत्या इत्यादीसंबंधी माहिती देण्यासाठी.

५) मार्गदर्शनपर (Counselling):
कोणत्याही बाबतीत विद्यार्थ्यांना मागदर्शन करण्यासाठी.


पूर्वनियोजित व नियंत्रित (Structured Interview):
    या प्रकारात उद्देश व त्यानुसार पद्धती आधीच निश्चित केलेल्या असतात. उदा. विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी किंवा कौटुंबिक माहिती काढून घेण्यासाठी जर मुलाखत घ्यायची असेल तर त्यांना कोणते प्रश्न विचारायचे व ते कोणत्या क्रमाने विचारायचे हे अगोदरच ठरविण्यात येते.

    अलीकडे मुलाखत घेण्याला आणि लिहिण्याला फार महत्त्व आले आहे. मुलाखत ही केवळ मान्यवर अथवा प्रसिद्ध व्यक्तीचीच असते असे नव्हे. सर्वसामान्य माणसांच्या मुलाखती प्रसंगोपात घेतल्या जातात. उदा. आदिवासीच्या मुलाखती, फेरीवाल्याच्या मुलाखती, काही वेळा एकाहून अधिक व्यक्तींच्या मुलाखतीही एकावेळी घेतल्या जातात. मुलाखत कोणाचीही व कोणत्याही माध्यमासाठी असो मुलाखतकाराने, मुलाखतलेखकाने पुढील सूचना लक्षात ठेवाव्या.

१) मुलाखत देणारी व्यक्ती, मुलाखतीचे प्रयोजन व मुलाखत प्रकाशित करण्याचे माध्यम या तिन्ही घटकाचा नीट अभ्यास करावा. मुलाखत जर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची घ्यावयाची असेल तर मुलाखत घेण्यापूर्वीच तिची सर्व अनुषंगिक माहिती गोळा करावी.

२) मुलाखत घेणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोणतेही प्रश्न विचारून उत्तरे घेणे नव्हे.

३) मुलाखत देणाऱ्या व्यक्तीस मुलाखतीचे प्रश्न आधी देले तर उत्तरादाखल अधिक विस्तृत व नेमकी माहिती मिळण्याची शक्यता असते. अर्थात काही प्रश्न हे पूर्वकल्पना न देता विचारण्यातही गंमत असते.

४) मुलाखत घेताना प्रश्नोत्तरांची टिपणे काळजीपूर्वक घ्यावीत. मुलाखतीच्या विषयाचे स्वरूप लक्षात घेऊन आवश्यकतर ध्वनिमुद्रकाचा वापर करावा. मुलाखतीतील जी वाक्ये अवतरणचिन्हात उद्धत करण्याच्या योग्यतेची वाटतील ती वाक्ये तशीच असल्याची खात्री करून द्यावी.

५) मुलाखत घेतल्यानंतर मुलाखतीच्या लेखनाची दिशा ठरविताना माध्यमाची जाणीव ठेवावी. नियतकालीकांसाठी मुलाखत लेखन करताना शीर्षकालाही महत्वाचे स्थान असेत. शीर्षक आकर्षक व मुलाखतीचे सार व्यक्त करील असे योजावे. अमूक अमूक यांची मुलाखत' असे ढोबळ शीर्षक देण्यात काहीच कौशल्य नाही. शीर्षकादाखल मुलाखत देणाऱ्या व्यक्तीच्या तोंडाचे एखादे लक्षवेधक विधान अवतरण चिन्हात दिले तर त्याचा परिणाम चांगला होतो.

६) नियतकालिकासाठी मुलाखतलेखन, आणि रेडिओ, टिव्ही यांच्यासाठी मुलाखतलेखन यात फरक आहे. नियतकालिकामधील मुलाखत ही भूतकाळात घेतलेल्या मुलाखतीचा वृतांत असतो.

७) कोणत्याही प्रकारच्या मुलाखतीलेखनाची सुरुवात ही थेट प्रश्नोत्तरांनी करू नये. मुलाखतीला प्रास्तविक जोडावे. रेडिओ, टिव्हीच्या संदर्भात प्रस्ताविक व्यक्तीपरिचय प्रश्नोत्तरे-समारोप आणि आभार असा मुलाखतीचा क्रम ठरलेला असतो. नियतकालिकांच्या संदर्भात मात्र मुलाखतीचा क्रम ठरलेला असतो. नियतकालिकांच्या संदर्भात मात्र मुलाखत लेखकाला वेगवेगळे प्रयोग करणे शक्य आहे. अशा मुलाखत लेखनात सुरुवातीला प्रस्ताविक, व्यक्ती परिचय किंवा मुलाखतीतील सर्वात महत्वाचा भाग यांपैकी काहीही येऊ शकेल.

    मुलाखतलेखनाला असलेले हे महत्व लक्षात घेऊन मुलाखत घेण्याचे आणि लिहिण्याचे तंत्र आत्मसात केले तर नवोदितांना या क्षेत्रात भरपूर संधी आहे. संधी आहे. मुलाखत लेखनांचे तंत्र समजून घेण्यासाठी मुलाखती वाचण्याची ऐकण्याची सवय ठेवावी. त्याचप्रमाणे तर दिलेल्या मार्गदर्शक सूचनाही विचारात घ्याव्या. कोणत्याही मुलाखतीची प्रश्नावली कशी तयार करावी आणि दूरदर्शनसाठी घ्यावयाच्या मुलाखतीची संहिता कशी लिहावी याचेच फक्त नमुने पुढे दिले आहेत.

    मुलाखतीचे यश हे मुलाखतकाराच्या प्रश्नांवर बरेचसे अवलंबून असते. मुलाखतीसाठी प्रश्नांची निवड करण्यातही मुलाखतकाराची कसोटी लागते. कोणतीही मुलाखत घेण्यामागे विशिष्ट हेतू असतो. तो हेतू साध्य होईल अशा प्रकारचे प्रश्नांची निवड करावी लागते.


मुलाखत कशी घ्यावी - मुलाखत घेताना साधारणपणे पुढील सूचनांचा अवलंब करावा.

१) मुलाखतीचा उद्देश काय आहे याची स्पष्ट कल्पना असावी. म्हणजे विद्यार्थ्याच्या व्यक्तित्वाच्या कोणत्या अंगासंबंधी आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचे आहे. हे निश्चितपणे माहीत असावे.

२) वातावरण अगदी मनमोकळे असावे विद्यार्थी व शिक्षक यांच्यात आत्मीयतेचा संबंध (Rapport) प्रस्थापित झाल्यास विद्यार्थ्यांच्या मनावरचे दडपण दूर होऊन निःसंकोचपणे उत्तरे देऊ शकेल.

३) मुलाखत घेणाऱ्याची वृत्ती सहानुभूतिपूर्ण असावी त्याने विद्यार्थ्याच्या मनात विश्वास निर्माण करावा उत्तरे देण्यास त्याला प्रोत्साहित करावे. उत्तरे अप्रिय असली तरी आपली नापसंती दर्शवू नये.


मुलाखतीचे सादरीकरण
    व्याख्यान देण्यापूर्वी व्याख्यानाची उद्दिष्ट्ये निश्चित करणे, आपल्या व्याख्यानासाठी आवश्यक असणारा वेळ निश्चित करणे, ज्या लोकांना व्याख्यान द्यावयाचे आहे. त्यांचे त्या विषयासंबंधीचे पूर्व ज्ञान लक्षात घेणे त्या लोकांच्या एकूणच बौद्धिक स्तर लक्षात घेणे व या सर्व बाबींची दखल घेऊन व्याख्यानांचे नियोजन करणे आवश्यक असते.

व्याख्यात्याने आपले व्याख्यान सादर करताना ते परिणामकारक होण्यासाठी काय करावे :
१) मोठ्याने व स्पष्ट बोला. बोलताना आवाजात चढउतार करा. आवश्यक तेथे विसावा (Pause) घ्या. फार घाईने बोलू नका.

२) विषय सहज सुलभ होईल अशा दृष्टीने व्याख्यानाची मांडणी करा.

३) विशिष्ट मुद्यांचे स्पष्टीकरण, आवश्यक तेथे भर, अधून मधून संकलन व विषयातील मुद्यांचे दैनंदिन जीवनातील घटनांशी संबंध प्रस्थापन इत्यादीचा वापर करा. विनाकराण दीर्घ पल्ल्याची मोठी विधाने टाळा. साध्या व सोप्या भाषेत बोला.

४) एखाद्या महत्वपूर्ण विधानावर प्रतिसाद मिळण्यासाठी संधी द्या. अधूनमधून प्रश्न विचारा व लोकांना शंका विचारायला प्रवृत्त करा. श्रोत्यांना व्याख्यानात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करा.

५) आपल्या व्याख्यानाच्या विषयाच्या संबंधित अशी अधिक माहिती घ्या. अधिक संदर्भ साहित्याचे वाचन करून आपला विषय समजून घ्या.

६) व्याख्यान वेळेवर सुरु करा. उशीर टाळा. तसेच वेळेपूर्वी व्याख्यान संपविण्याची घाई करु नका. परंतु प्रत्येकवेळी वेळेत व्याख्यान पूर्ण होत नाही, असे करु नका.

७) व्याख्यान देताना श्रोत्यांकडे पहा. त्यांच्या नजरेला नजर भिडवा. केवळ पहिल्या ओळीतील लोकांकडे पाहून बोलू नका. इतर क्रिया करताना बोलू नका. श्रोत्यांची नजर टाळून बोलू नका.

८) श्रोत्यांना सहजासहजी उपलब्ध होणार नाही परंतु पुस्तकांशी निगडीत अशी माहिती संग्रहित करा व तिचा वापर व्याख्यानात करा.

९) आपल्या नोटस्मध्ये वाचून बोलू नका.

१०) अत्यंत उत्साहाने बोला. स्वतः थकल्यासारखे किंवा कंटाळल्यासारखे वागू नका. अत्यंत आवडीने बोला व श्रोत्यांमध्ये उत्साह निर्माण करा.


    व्याख्यान यशस्वी होण्यासाठी सुधारित रुपे ही जास्त स्वीकारणीय ठरतात. कारण व्याख्यानाच्या शुद्ध स्वरुपातील दोष काढून टाकून या सुधारणा केलेल्या आहेत. व्याख्यानांच्या सुधारित रुपामध्ये व्याख्यान-कम-दिग्दर्शन, व्याख्यान-कम-चर्चा, व्याख्यानात प्रश्नांचा वापर, व्याख्यानात दृक्-श्राव्य साधनांचा वापर, ओव्हर हेड प्रोजेक्टरचा उपयोग करुन व्याख्यानात इत्यादी प्रकारचा समावेश केला जातो. त्यामुळे श्रोत्यांना आपले व्याख्यान साध्या व सरळ भाषेत समजते. त्यांना आपले विचार समजण्यात अडचण निर्माण होत नाही.


_ सिद्धार्थ मयेकर

I write... ✍🏻 what I feel... 💖💖

Copyright© 2020 - 2022



Sidharth

I am experienced in Digital Marketing, Web Developing, Banner Designs, Computer Repairing, Teaching also Motivational Speech.

Post a Comment

Previous Post Next Post