मनाची मनमानी..

     




     थांब म्हटलं तर थांबत नाही.. आणि कुठे जाणार ते ही सांगत नाही.. आहे माझं पण माझंच ऐकत नाही.. अशीच काही परिस्थिती आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या मनाची. याला कठीण मार्ग आवडत नाही, सतत सोप्या मार्गाच्या शोधात असतो आणि संकटात सापडला की म्हणतो.. "मी नाही..तूच तो.." आपण सर्व जण हेच करतो. आपलं मन हे आपल्या नियंत्रणात असणे आवश्यक आहे. कारण बहुतेक वेळा आपण मनाची मनमानी करतो आणि कळत नकळत संकट ओढवून घेतो. मन म्हणजे काय? मन हे मानसिक घटनांसाठी जबाबदार असलेल्या शाखांचा संच आहे. या मध्ये केवळ मानसिक घटना नाही तर मानसिक अस्वास्थ्यामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यात होणाऱ्या सर्व चांगल्या आणि वाईट घटनांना जबाबदार असतो. ज्या व्यक्तीचे मन नियंत्रणात असतं तो कायम आनंदी असतो, अगदी दुःखात ही तो खचून जात नाही. आलेल्या प्रत्येक संकटांना सामोरे जाण्यासाठी आपले मन स्थिर असणे गरजेचे आहे. विचार करा आपण कित्येकदा किती तरी असे चुकीचे निर्णय घेतलेले आहेत ज्या मुळे आपलेच नुकसान झालंय. त्यापेक्षा ही जास्त वेळा आपण निर्णय घेतलाच नाही या मुळे नुकसान झालंय. सतत दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, आपल्या आयुष्याचे निर्णय कोणी तरी दुसरी व्यक्ती घेते. या मुळे या मनाची मनमानी अधिक प्रमाणत वाढते. आता हे सर्व थांबवणार कसं? या साठी स्व ओळख होणे गरजेचे आहे. या साठी ३ गोष्टी महत्वाच्या आहेत. १) मी कोण आहे हे जाणून घेणे.. २) मी आता कुठे आहे ते पाहणे.. ३) माझे ध्येय्य काय आहे ते समजून घेणे. या तीन गोष्टी तुमचं आयुष्य सुधारू शकतात. यशस्वी होण्यासाठी आपले मन आपल्या नियंत्रणात असावचं लागेल. 

   मन अस्थिर आहे हे समजताच शक्यतो शांत बसणे उत्तम. कारण याच वेळी आपण टोकाचे निर्णय घेतो. नकळत आपल्याच जवळच्या माणसांना दुखावून जातो. शब्द हे एखाद्या धारदार शस्त्रा पेक्षा ही जास्त खोल जखम देतात. त्या मुळे मनाची मनमानी आपले इतरांन सोबतचे नाते खराब करू शकते. आपल्या मनावर नियंत्रण करणे काही कठीण गोष्ट नाही आहे पण त्या साठी स्व ओळख होणे गरजेचे आहे. कारण मी कोण आहे हे समजताच माझे मन काय आहे हे समजणे शक्य होते. स्व ओळख होण्यासाठी काय करावं? याचं उत्तर आपलं आपणच शोधायचं असतं. 

_ सिध्दार्थ मयेकर.

I write... ✍🏻 what I feel... 💖💖
Copyright© 2020 - 2022
Sidharth

I am experienced in Digital Marketing, Web Developing, Banner Designs, Computer Repairing, Teaching also Motivational Speech.

Post a Comment

Previous Post Next Post