दरवर्षी जगभरात ८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिवस साजरा केला जातो. १७ नोव्हेंबर १९६५ पासून युनायटेड नेशन्सच्या युनेस्कोने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. हे दिवस आपल्या समाजात जागरूकता पसरवण्यासाठी खूप महत्वाची भुमिका बजावतो पण आज हि आपल्या भारता मध्ये अनेक खेड्यांमध्ये उत्तम शिक्षण देणाऱ्या संस्था किंवा शाळा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक खेड्यातील असंख्य मुले आज हि शिक्षणापासून वंचित आहेत. आज हि देशात स्त्री साक्षरतेचे प्रमाण ६४% इतकेच असल्याचे पाहायला मिळते. पुस्तकी ज्ञाना सोबतच डिजिटल साक्षर होणे देखील महत्वाचे आहे. विशेषतः गृहिणी आणि सर्वसामान्य व्यक्तींना डिजिटल साक्षर बनविणे हि काळाची गरज आहे. ऑनलाईन बँकिंग सारख्या मध्यातून व्यवहार करता यावे याकरिता गावो-गावी याचे प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे. तरच आपण खऱ्या अर्थाने साक्षर देशांच्या रांगेत अव्वल स्थानी असू.
_
सिद्धार्थ मयेकर