भारतामध्ये १ जानेवारी २०२२ ते ३१ मार्च २०२२
पर्यंत सुमारे १,४५,७२,३५,०००.०० पेक्षा हि जास्त सायबर हल्ले झाले आहेत आणि २,००,००० हून अधिक धमक्या दिल्या गेल्या
आहेत. एकंदरीत पाहता सायबर सुरक्षा हि काळाची गरज नाही तर आज स्वतःच एक काळ बनली
आहे. संगणकाचा वापर दिवसेंदिवस वाढत गेला पण आज हि संगणक साक्षरताचे प्रमाण पुरेसे उल्लेखनीय
नाही.
दररोज बातम्या आणि वृत्त पत्रांमध्ये मध्ये किमान २ तरी घटना या सायबर गुन्ह्या बाबत असतात. सायबर हल्ले अनेक प्रकारचे असतात आणि ते थांबविण्यासाठी संगणक साक्षर होणे किंवा सायबर सुरक्षा जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. ओ. टी. पी (OTP) वन टाईम पासवर्ड सामन्यात: एक सहा अंकी क्रमांक, पण शुल्लक वाटणारी गोष्ट आपल्याला खूप अडचणीत टाकू शकते. ओ. टी. पी चा वापर हा युझर (वापर कर्ता) ने दिलेला मोबाईल क्र. हा त्याचाच आहे ना याची खात्री करण्यासाठी पाठविला जातो. तसेच आपल्या नावाने कोणते हि गैरव्यवहार होऊ नयेत या करिता सुरक्षा म्हणून पाठविलेला असतो. पण आपण त्याला पुरेसे महत्व देत नाही. ओ. टी. पी (OTP) हा ठराविक काळासाठी उपलब्ध होतो या ३ मिन. मध्ये आपण याचा वापर कसा करतोय किंवा कशासाठी करतोय हे जाणून घेणे महत्त्वाचे. आपल्याला वारंवार सांगितले जाते कि आपला ओ. टी. पी (OTP) कोणत्याही अन्य व्यक्ती सोबत शेअर करू नका. तरही आज हि फक्त ओ. टी. पी (OTP) चुकीच्या माणसाला दिल्या मुळे असंख्य बँक व्यवहारामध्ये फसवणूक झाल्याचे कळते. हे कसे होते?
आपण बऱ्याच वेळा ऑनलाई व्यवहार करण्यास घाबरतो अशा वेळी बँक मध्ये स्वत जावून आपण व्यवहार करतो याच वेळी कधी तरी आपण कोण कडून फॉर्म भरून घेतो किंवा आपले बँक पासबुक उघडून ठेवतो अशा वेळी कोणीही व्यक्ती आपल्या खाते क्र. पर्यंत पोहचते अथवा फोटो काडून घेते त्या नंतर त्याचा वापर करून ते आपल्याशी संपर्क करतात आणि बँक कडून बोलत असल्याचे सांगितले जाते किंवा बक्षीस जिंकल्याचे सांगितले जाते. त्यानंतर आपल्या बँक खात्याशी सल्लाग्न मोबाईल क्र. वर ओ. टी. पी (OTP) पाठविला जातो आणि आपण देवून जातो. या वेळी आपल्या बँकेचे रक्कम रिकामी केली जातो किंवा इतर कसाही वापर केला जावू शकतो. या बद्दल घ्यावयाची काळजी कोणती ? १) कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपले मोबाईल क्र. अथवा बँकेचे डिटेल्स देवू नयेत. २) कोणताही ओ. टी. पी (OTP) येतो त्यावेळी सदर मेसेज कोणी पाठविला आहे त्याचे नाव आपल्याला पाहायला मिळते. कोणतीही शंका असल्यास ओ. टी. पी (OTP) इंटर करू नका. ओ. टी. पी (OTP) चा ठराविक कालावधी आल्या मुळे आपण सेंडरचे नाव वाचत नाही. ३) ओ. टी. पी (OTP) हा ठराविक वेळेसाठी असला तरी तो पुन्हा री-सेंड करता येतो. त्यामुळे घाईघाईने OTP इंटर करू नये.
आता हे झाल बँक व्यवहाराबद्दल, ऑनलाईन बद्दल काय? ऑनलाईन बँकिंग व्यवहार हे जेवढे सोयीचे आहे तेवढेच ते जपून करणे आवश्यक आहे. आपण स्कॅन केलेला QR कोड नेहमी तपासून बघाना. कोड स्कॅन केल्या नंतर दिसणारे नाव पुन्हा पडताळून पहा आणि त्या नंतरच पेमेंट करा. अनोळखी नंबरने येणारे कॉल स्वीकारताना आपली वैयक्तिक माहिती देवू नका. तसेच कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका. मेसेज द्वारे येणाऱ्या शॉर्ट लिंक पूर्ण माहिती आणि विश्स्वनीय असल्याशिवाय ओपन करू नका.
कोणाही बँक व्यवहार करताना चूक झाल्यास किंवा आपण सायबर हल्ल्यास बळी ठरलो तर काय ?
1) त्वरित आपल्या बँकेशी संपर्क साधा आणि माहिती ध्या.
2) आपले ATM/क्रेडीट कार्ड तात्पुरते बंद करा,या साठी आपल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
3) सायबर हल्ला झाल्याची शंका असल्यास आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवा.
4) के कडून सांगितल्या जाणाऱ्या सूचना पाळा आणि त्या नुसार पुढील कार्यवाही पूर्ण करा.
त्याच बरोबर नेहमी जागरूक राहणे महत्त्वाचे, संगणक साक्षारता आणि ऑनलाईन व्यवहार या बद्दल मोफत कोर्स उपलब्ध होतात ते पूर्ण करून माहिती जाणून घ्यावी. तरुण मुलांनी सायबर सुरक्षे बद्दल आपल्या घरी मोठ्या व्यक्तींसोबत या बद्दल चर्चा करावी आणि त्यांना माहिती द्यावी. सायबर सुरक्षेचे महत्त्व जाणून घ्या आणि काळजीपूर्वक तंत्रज्ञानाचा वापर करा.
धन्यवाद !
_सिद्धार्थ
मयेकर